‘व्यावसायिक कुशलतेतून
घडेल युवकांचे भविष्य’

‘व्यावसायिक कुशलतेतून घडेल युवकांचे भविष्य’

पुणे, ता. २७ : ‘‘पुणे शहर व जिल्ह्यातील औद्योगिक व शैक्षणिक प्रगतीचा विस्तार पाहता तंत्रज्ञानातील विकास, व्यावसायिक कुशलता, विविधता, विपुलता व विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष ज्ञान व क्षमतांचे अवलोकन यांचा विचार करता, भविष्यात शैक्षणिक संस्था व उद्योग क्षेत्र एकमेकांच्या समन्वयातून चालणे आवश्यक आहे. कारण तंत्रज्ञानातील प्रगती व व्यावसायिक कुशलतेद्वारे युवकांचे भविष्य घडू शकेल,’’ असे मत मिटकॉन फोरमचे संचालक गणेश खामगळ यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेच्यावतीने नावीन्यता व उद्योजकता या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयीन युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, डॉ. सौरभ सावजी, नेहा भागवत, प्रीतम अहिरे आदी उपस्थित होते.

खामगळ पुढे म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्राला तांत्रिक व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी युवकांना प्रत्यक्षात उद्योगाचे ज्ञान, योग्य पद्धतीची माहिती, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकात्मिक व्यवस्थापन, गुणवत्ता, कार्यव्यग्रता व योग्य ते पारखण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक पातळीवर समन्वयातून प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’ या परिषदेत मेट्रोचे महाव्यवस्थापक टी. मनोजकुमार, जी. एन. सोल्यूशन कंपनीचे महाव्यवस्थापक महेश कुलकर्णी, इंडेक्स इंजिन कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव जहागीरदार यांनी मार्गदर्शन केले. प्रा. रोहिणी हंचाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. धनश्री पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com