पत्नीला पेटवून, तर मुलाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला पेटवून, तर मुलाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न
पत्नीला पेटवून, तर मुलाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न

पत्नीला पेटवून, तर मुलाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा आणि मुलाच्या गळ्यावर पाय देऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढव्यातील कामठे इमारतीत हा प्रकार घडला.
या प्रकरणी पती लोकेश मगजी, सासरे, सासू यांच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २५ वर्षीय पत्नीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. लग्नात दागिने, तसेच कपाट दिले नाही. तुझ्या आई-वडिलांकडून दागिने घेऊन ये, अशी मागणी करून आरोपींनी तिचा छळ सुरू केला होता. पती लोकेशने तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन अंगावर पेट्रोल ओतले. तर लहान मुलाच्या गळ्यावर पाय ठेऊन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर २०२१ ते २५ मे दरम्यान हा प्रकार घडला, असे पत्नीने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.