सांधेरोपण सर्जरीसाठी पुणे रोबोटीक हब

सांधेरोपण सर्जरीसाठी पुणे रोबोटीक हब

पुणे, ता. २९ ः ‘‘शस्त्रक्रियेतील नेमकेपणा, अचूकता आणि स्वतःच्या पायांवर पुन्हा लवकर चालणे या अत्यंत गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या गोष्टी रोबोटिक गुडघे प्रत्यारोपणाने सहज शक्य झाल्या आहेत. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढत सातत्याने वाढत असून, त्यात पुणे हे केंद्र होत आहे,’’ असा सूर ‘इंटरनॅशनल सिम्पोसियम ऑफ रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट’ या परिषदेतून निघाला.

‘इंटरनॅशनल सिम्पोसियम ऑफ रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट’ ही चवथी परिषद पुण्यात झाली. देशातील रोबोटिक गुडघे प्रत्यारोपणचे प्रणेते लोकमान्य रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे या परिषदेचे संयोजक अध्यक्ष होते. गुजरातमधील सांधेरोपण तज्ञ, डॉ. विक्रम शहा, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शरण पाटील प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय जीवनकार्यासाठी लोकमान्य रुग्णालयाचे संस्थापक डॉ. विद्याधर वैद्य तसेच डॉ. अरोरा यांचा सन्मान केला. डॉ. शहा यांनी देशातील सांधेरोपण शस्त्रक्रियेतील तंत्रज्ञानातील प्रगतीची स्थित्यंतरे याचा प्रवास उलगडला व त्यातील विविध घटकांचा ऊहापोह केला.


असे केले परिषदेत अधोरेखित
- रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण पद्धतीमुळे रुग्णाला लवकर पूर्ववत आयुष्य जगता येते.
- आतापर्यंत अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहजतेने साधणे रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे सहजशक्य झाल्याचे सर्वांनी मान्य केले.
- रुग्णाच्या शस्त्रक्रियोत्तर परिणामामध्ये त्याची उपयुक्तता अधिक सिद्ध होते.
- या शस्त्रक्रियेतील प्रगतीचा आलेख हा वाढता आहे.
- रुग्णांमध्येही या शस्त्रक्रियेस स्विकारर्हता वाढत आहे.
- वाजवी दरातील उपचारामुळे देशातील व परदेशातील रुग्णांची पुण्याला पसंती जास्त आहे.
- सांधेरोपण शास्त्रातील रोबोटिक उपचारासाठी भविष्यात पुणे हेच केंद्र असेल.
- आजमितीला देशभरात दरवर्षी पंधरा हजाराहून अधिक रुग्ण रोबोटीकव्दारे उपचार घेतात.
- ओमान, यमन, दुबई, आफ्रिका यासारख्या देशातूनही तंत्रज्ञानामुळे रुग्ण पुण्यात येतात.

‘‘हे तंत्रज्ञानाचे युग आहे. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे असाध्य वाटणाऱ्या उपचारातही कमालीची अचूकता आली आहे. संगणकामुळे आता माहिती संकलित करणे, त्याचे पृथ्थकरण करून विविध शस्त्रक्रियांसाठी नियमावली तयार करणे शक्य होईल की जे तरुण उमद्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शक ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण क्रांतिकारी गोष्टी उपलब्ध होतील ज्यांचा रुग्णांसाठी फायदा होईल.’’
- डॉ. शरण पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ

‘‘तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रातील वापर हा रुग्णाच्या आजारावर उपचारातील अनिवार्य भाग आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाचा देशात आता सर्वत्र वापर होत असून पुणे यामध्ये अग्रेसर आहे. सुरुवातीचा आव्हानात्मक प्रवास आता प्रगतीच्या टप्प्यावर आहे.’’
- डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ, लोकमान्य रुग्णालय

PNE23T45814

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com