माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात
माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात

माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पुण्यात पार पडले. यामध्ये २९ जिल्‍ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक कर्नल राजेंद्र जाधव (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख, राज्य कोषाध्‍यक्ष विवेक पांडे, समितीचे अध्यक्ष व पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे उपस्थित होते. मागील दहा वर्षात संघटनेच्या माध्यमातून शासकीय सेवेतील माजी सैनिकांची वेतन निश्चिती, बदली धोरणांमध्ये प्राधान्य क्रमाचा शासन निर्णय, मालमत्ता करात सूट, टंकलेखन परीक्षेतील शिथिलता, पाल्यांना व्यावसायिक शिक्षणामध्ये पाच टक्के अटीमध्ये शिथिलता, शिष्यवृत्ती योजनेमध्ये सवलत आदी मुद्यांवर केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच कार्यक्रमादरम्यान संघटनेतील रिक्त पदांसाठी निवडणुकाही पूर्ण झाल्या. निवडणुकीमध्ये बाळासाहेब जाधव यांची संघटनेच्या सरचिटणीस पदी, संजय मेटिल यांची चिटणीस पदी, बिपिन मोघे यांची नागपूर विभागीय उपाध्यक्षपदी व किशोर पाटील यांची नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाली.