
पहिल्या लॉजिस्टीक प्रदर्शनाला पुण्यात प्रतिसाद
पुणे, ता. २९ : एक्झिम इंटिग्रेटेड क्लबच्या महिला शाखेने भरविलेल्या पहिल्या लॉजिस्टिक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे कस्टम, पुणे डीजीएफटी, कस्टम ब्रोकर्स, एक्स्प्रेस कुरिअर, कन्सोल एजंट्स, शिपिंग लाइन आदींनी त्यात भाग घेतला.
या प्रदर्शनात ३० स्टॉल्सचा सहभाग होता. प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती पाटील यांच्या हस्ते झाले. क्लबचे हे पाचवे प्रदर्शन होते. आयात-निर्यात व्यापाराला चालना देण्याच्या आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले होते. पुण्यातील हे एक्झीम ट्रेड प्रदर्शन देशातील पहिलेच प्रदर्शन होते. शिल्पा सोनपत्की, शिब्बू सिंग, दीपा बड्डाप, सोनाली गायकवाड यांनी त्याचे नेतृत्व केले. त्यांनी या प्रदर्शनाकरीता ‘आम्ही नेतृत्व करतो, बदल घडविण्यासाठी’ असे घोषवाक्य घेतले होते.
क्लबचे संस्थापक आनंद परांजपे यांनी प्रदर्शनाठी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे क्लबचे सदस्य शशिकांत कुलकर्णी, सिद्धार्थ सोनावणे, तुषार सुतार, प्रदीप चव्हाण, रॉबिन व मिलिंद कदम यांनी त्यासाठी सहकार्य केले.