स्वाक्षरी मोहिमेला 
नागरिकांचा मोठा प्रतिसाद

स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पुणे, ता. २९ ः केंद्र सरकारच्या निषेधार्थ राजीव गांधी स्मारक समितीतर्फे आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महिलांवरील अत्याचार, बड्या उद्योगपतींचे गैरव्यवहार, हुकूमशाही कारभार अशा गोष्टी वाढीस लागल्या आहेत. महिला कुस्तीपटूंना न्याय मिळत नाही. अदानी सारख्या उद्योगपतींना भ्रष्टाचार करूनही अभय मिळते. द केरळ फाइल्स चित्रपटातून देशाच्या धार्मिक विभाजनाचा डाव टाकला जातो,‘ असे आरोप यावेळी करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नेतृत्वाखाली टिळक चौकात (अलका टॉकीज) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते, युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संदीप बर्वे, ॲड. अभय छाजेड, गणेश नलावडे आदी उपस्थित होते.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com