अकरावी प्रवेश प्रक्रिया ः आवश्‍यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ‘हमीपत्रा’चा पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेश प्रक्रिया ः

आवश्‍यक कागदपत्रे उपलब्ध 
नसल्यास ‘हमीपत्रा’चा पर्याय
अकरावी प्रवेश प्रक्रिया ः आवश्‍यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ‘हमीपत्रा’चा पर्याय

अकरावी प्रवेश प्रक्रिया ः आवश्‍यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ‘हमीपत्रा’चा पर्याय

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : तुम्ही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी असाल आणि तुमच्याकडे प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र सध्या उपलब्ध नसतील, तर तुम्ही सध्या हमीपत्र सादर करू शकता. त्यासाठी प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी उर्वरित आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात येतील, असे हमीपत्र विद्यार्थ्यांना, पालकांना त्यांच्या स्वाक्षरीने द्यावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा असली, तरीही इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील ३१९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. दरम्यान, प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्जांचा भाग एक भरण्याची सोय उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अर्ज भरताना उपलब्ध नसल्यास त्याबाबतचे हमीपत्र विद्यार्थ्यांना, पालकांना स्वत:च्या स्वाक्षरीने सादर करता येणार आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशादरम्यान कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळवायचा असल्यास, आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना अपलोड करावी लागणार आहेत. दरम्यान, सध्या उपलब्ध नसलेली आवश्यक प्रमाणपत्रे मूळ प्रतीसह प्रवेशाच्या वेळी सादर करण्यात येईल, असे हमीपत्र (किंवा घोषणापत्र) विद्यार्थ्यांना, पालकांना सादर करावे लागणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अधिकृत संकेतस्थळाद्वारे ही माहिती दिली आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील आकडेवारी
(सोमवारी सायंकाळपर्यंतची)
तपशील - विद्यार्थ्यांची संख्या
- नोंदणी केलेले - २२,५४२
- अर्ज भरून लॉक केलेले - १०,८१८
- ॲटो व्हेरिफाय झालेले - ४,७२५