महिला कुस्तीपटूंच्या अटकेच्या 
निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

महिला कुस्तीपटूंच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे, ता. २९ ः ‘ब्रिजभूषण सिंह यांना अटक झालीच पाहिजे’, ‘खिलाडीओंके सन्मान में, राष्ट्रवादी मैदान में’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंना झालेल्या मारहाण व अटकेच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे सोमवारी सायंकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, माळवदकर, प्रमित गोरे, रुपेश संत, अंजली लोटके आदी सहभागी झाले होते. जगताप म्हणाले, ‘‘आंदोलक महिला कुस्तीपटू या त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी, ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत होत्या. असे असताना त्यांना अक्षरशः फरफटत नेऊन मारहाण करीत अटक करण्याचा प्रकार गंभीर आहे. देशातील खेळाडूंना अशी वागणूक मिळणार असेल, तर पक्ष गप्प बसणार नाही. कारवाई करणाऱ्या पोलिसांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे.’’

४५९६१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com