
विद्येच्या प्रांगणात
पुणे इंटरनॅशनल स्कूलमधील
बारावीचे विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे, ता. ३० : विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शाळेचे अध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष ॲड. रेणुका चलवादी, प्राचार्य स्मिता लोंढे, व्यवस्थापिका सायली शिंदे, उपप्राचार्य अश्विनी मोहिते आदी उपस्थित होते. चिन्मयी कुरवाडे, आलोक कुलकर्णी, नरेश चौधरी, जीना शेख, अवनी सावरकर, किमया गायकवाड, आनिषा राजपुरोहित, स्वयम फिरोदिया, महेश नायक यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षक अश्विनी मोहिते, श्यामल मोहिते, रुची सहस्त्रबुद्धे, रूपाली कचरे, श्रद्धा मोहिते, सौरभ कोथावदे यांनी मार्गदर्शन केले.
सणस विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
पुणे, ता. ३० : नारायणराव सणस विद्यालयातील राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा दिली. यात पीयूष घुगे, कृष्णा आनंद दास, वैष्णवी दरोडे, कार्तिकी रायकर, श्रुतिका जगताप या पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. शाळेतील अनुज हगवणे, दर्शिल कवाणे, प्रथमेश जाधव, आदित्य शिंदे, विशाल गोडसे, कर्तव्य कबले, वेदांत साळुंखे, विराज थोपटे, जान्हवी नलावडे, तन्वी निकम, पायल केंडे, श्रेया मोहिते आणि राणी शिंदे या १३ विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. विभागप्रमुख सुवर्णा भगवान, सहायक तानाजी खोमणे, महिपत मोरे यांनी मार्गदर्शन केले. शाळा समिती सदस्या विभावरी सणस, मुख्याध्यापक संजय बांदल, उपमुख्याध्यापक पोपट कांबळे, पर्यवेक्षक महादेव पवार, पर्यवेक्षिका सुवर्णा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नंदादीप एज्युकेशन सोसायटीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे, ता. ३० : नंदादीप एज्युकेशन सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेत सलग चौथ्या वर्षी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या वर्षी काही विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र कोठारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयाचे भरीव यश
पुणे, ता. ३० : झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. परीक्षेत नित्या पोतदार (९३ टक्के, वाणिज्य शाखा), स्नेहा वडनेरे (९१ टक्के, विज्ञान शाखा) यासह अन्य विद्यार्थी यशस्वी झाले. विद्यार्थ्यांना सोसायटीचे सल्लागार प्रदीप खांदवे, प्राचार्या अनुराधा निकम यांनी मार्गदर्शन केले.
पोदार शाळेतील विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी
पुणे, ता. ३० : आंबेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यश मिळविले. स्वराली बुद्रुक हिने ९९ टक्के, ओजस शहा याने ९८.६ टक्के, अवनी धमणे हिने ९८.२ टक्के गुण मिळविले. ६८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. मुख्याध्यापिका अनघा घोलप यांनी मार्गदर्शन केले.