Sun, Sept 24, 2023

‘कवितेतून आनंदी जीवनाची प्रचिती’
‘कवितेतून आनंदी जीवनाची प्रचिती’
Published on : 30 May 2023, 3:00 am
पुणे, ता. ३० : ‘‘सुखी समाधानी आणि आनंदी जीवनाची प्रचिती अंजली देशपांडे यांच्या कवितेतून आल्याने या कविता प्रभावशाली ठरल्या आहेत,’’ असे मत ज्येष्ठ लेखक अॅड. अनिल पाठक यांनी व्यक्त केले. स्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने अंजली देशपांडे यांच्या ‘ओंजळीतील मोती’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ॲड. पाठक बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून गायिका चारुशीला बेलसरे उपस्थित होत्या. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विनायक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर नेहा हवेली यांनी सूत्रसंचालन केले.