पुण्यश्लोक अहिल्याबाईंना अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्याबाईंना अभिवादन

पुणे, ता. ३१ ः शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध संस्था, संघटनांकडून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. सारसबाग येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणेतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला व होळकर यांच्या देव, देश, धर्म कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शहरप्रमुख गजानन थरकुडे, शहरप्रमुख संजय मोरे, बाळा ओसवाल, बाळासाहेब मालुसरे, अशोक हरणावळ, किशोर राजपुत, अनंत घरत आदी उपस्थित होते. तसेच दुर्गा ब्रिगेडतर्फे अभिवादन करण्यात आले. ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर, भाग्यश्री साळुंखे, सुवर्णा माने, सुनिता नेमूर, अवंतिका भोर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी अभय भोर, छावा ब्रिगेड अध्यक्ष उमेश कोकरे, बबलु मायनर, देवेंद्र धायगुडे, प्रथमेश गवळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com