वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत याचिका

वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत याचिका

पुणे, ता. ३१ : वडू बुद्रुक येथील जमिनीबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरोधात वक्फ बोर्डाने छत्रपती संभाजीनगर येथील ‘महाराष्ट्र वक्फ लिब रेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स’कडे याचिका दाखल केली आहे. यावर त्यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्तांना याबाबत खुलासा करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. मुदतीत खुलासा न दिल्यास फौजदारी कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. वाद सुरू असलेली ही जमीन देवस्थान इनाम जमीन आहे. त्याची १८६२ ची सनद आहे. ही जमीन वर्ग २, ३ मध्ये आहे. २०१६ मध्ये सातबारावर तशी नोंद आहे. त्यांनतर चार एप्रिल २०१६ च्या ‘जीआर’नुसार तहसीलदारांनी सातबारावर संस्थेच्या नावाची नोंद केली. त्यावर प्रांताकडे अपील केले गेले. त्यांनी वक्फ बोर्डाची मागणी मान्य केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनीदेखील वक्फ बोर्डाच्या बाजूचा निर्णय कायम ठेवला. मात्र विभागीय आयुक्तांनी इनाम जमिनीवर खासगी लोकांची नावे चढविण्याचा निर्णय दिला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई मुल्ला यांनी बुधवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत दिली. या विरोधात महाराष्ट्र वक्फ टास्क फोर्सकडे याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com