
बीआरटी फोटो फिचर
बीआरटी थांब्यांची दुर्दशा
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नगर रस्त्यावर उभारलेल्या ‘बस रॅपिड ट्रान्झिट’ (बीआरटी) मार्गावरील बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. या थांब्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरवातीच्या काळात सुरक्षारक्षक नियुक्त केले होते. परंतु त्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहेत. त्यामुळे या थांब्यांची दुर्दशा होऊ लागली आहे. त्याकडे महापालिका आणि पीएमपीचे ही दुर्लक्ष होत आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जाऊ लागला असून प्रवाशांचीही गैरसोय होत आहे.
46137 साठे बिस्कीट बस थांबा ः स्वयंचलित दरवाजाची यंत्रणा निकामी
46138 मेंटल कॉर्नर बस थांबा ः स्वयंचलित दरवाजाच्या सर्व काचा फुटल्या
46139 फुलेनगर बस थांबा ः प्रवाशांना बसण्यासाठीचे लोखंडी बाकच गायब
46140 होमगार्ड ऑफिस बस थांबा ः बसथांब्याचे छत तुटून खाली लटकत असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका
-----