‘शिवराज्यभिषेक दिन राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिवराज्यभिषेक दिन राष्ट्रीय 
शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करा’
‘शिवराज्यभिषेक दिन राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करा’

‘शिवराज्यभिषेक दिन राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करा’

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : शिवराज्याभिषेक दिन (६ जून) हा दिवस केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन’ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक आणि शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

गायकवाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ आणि उदय सामंत यांनी ६ जून शिवराज्याभिषेक हा दिवस सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणून शासकीय परिपत्रक काढून आपआपल्या मंत्रालयातर्फे साजरा करण्यास सुरुवात केली. राज्यातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतन आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस साजरा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा दिवस आता शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.