छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन

छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन

पुणे, ता. ३१ : आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या आणि देशाला अनेक सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या कुस्तीगीर महिलांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे फर्ग्युसन रस्त्यावर कलाकार कट्टा येथे बुधवारी आंदोलन करण्यात आले.
‘‘खासदार ब्रिजभुषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असताना भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. गेल्या ३८ दिवसांपासून या सर्व महिला खेळाडू दिल्लीच्या जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. परंतु, देशाचे नाव जगापुढे उंचावणाऱ्या खेळाडूंना रविवारी ज्या पद्धतीने पोलिस बळाचा वापर करून फरफटत नेण्यात आले हे अत्यंत निंदनीय आहे,’’ असे छात्रभारतीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांनी सांगितले. तर, ‘‘देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवून देणाऱ्या महिलांवर अत्याचार होत असेल तर सर्वसामान्य मुलींचे काय? असा प्रश्न उपस्थित राहतो.’’ असे जिल्हा संघटिका दिव्या कांबळे यांनी सांगितले.
या वेळी राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य कार्यकारिणी सदस्य तुकाराम डोईफोडे, माजी कार्यकर्ते प्रवीण गुंजाळ, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते प्रकाश कदम, छात्रभारती पुणेचे संघटक सौरव शिंपी, वैष्णवी कोळी, मिलिंद कांबळे, मुस्कान नदाफ, अजय कांबळे, अभिलाषा दुधपचारे, वैभव रंधे, आरती म्हस्के, अर्पिता पवार, श्रुती थोरात आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com