आदिवासी भागात निधी कमी पडू देणार नाही : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी भागात निधी कमी पडू देणार नाही : पाटील
आदिवासी भागात निधी कमी पडू देणार नाही : पाटील

आदिवासी भागात निधी कमी पडू देणार नाही : पाटील

sakal_logo
By

पुणे, ता. १ : लोकप्रतिनिधींकडून आदिवासी भागातील विकासकामांची माहिती घेऊन तेथील सुविधा निर्मितीकडे लक्ष देण्यात यावे. यासाठी निधी कमी पडल्यास सर्वसाधारण योजनेतून निधी देण्याबाबत विचार करू, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शेळ्या मेंढ्यांचे गट पुरविणे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांना वास्तविक मिळालेल्या लाभाबाबत माहिती घेण्यात यावी. पुढील बैठकीत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत नागरिकांना दिलेल्या लाभाची सविस्तर माहिती देण्यात यावी. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेच्या आढाव्यासाठी जिल्हास्तरावर शासनाची मंजुरी घेऊन स्वतंत्र समिती नेमण्यात येईल आणि समितीकडून दर तीन महिन्यांनी योजनेच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात येईल.’’