काव्य, नृत्यातून उलगडले सावरकर

काव्य, नृत्यातून उलगडले सावरकर

पुणे, ता. १ : ‘त्या तिघी’ या कादंबरीवर आधारित एकपात्री नाट्यप्रवेश, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध स्थळांवर लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे नृत्यमय सादरीकरण असलेला ‘सागरा प्राण तळमळला’ हा कार्यक्रम, युवा लेखक व व्याख्याते पार्थ बावस्कर यांचा ‘सावरकरांची लंडन वारी’ हा भारावून टाकणारा कार्यक्रम आणि ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ या सांगीतिक कार्यक्रमातून सावरकरांचे चरित्र उलगडले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘तू सूर्याचे तेज’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्याख्यात्या धनश्री लेले यांच्या ‘सावरकरांची अंदमानातील कविता’ या कार्यक्रमाने उपक्रमाला सुरुवात झाली. पुण्यातील कोटीभास्कर ग्रुपचे चिदंबर कोटीभास्कर यांनी कार्यक्रमाचे आयोजन तर अजय धोंगडे यांनी संयोजन केले होते. सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीपाद खुर्जेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, ज्येष्ठ भरतनाट्यम गुरू सुचेता भिडे चापेकर, जनकल्याण समितीचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक डंबिर, शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे, कवी वैभव जोशी आणि निस्सीम सावरकर प्रेमी जयराम नारगोलकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com