शिका रेडी टु कुक इन्स्टंट मसाले, ग्रेव्ही

शिका रेडी टु कुक इन्स्टंट मसाले, ग्रेव्ही

पुणे, ता. १ : बाजारपेठेची मागणी, सद्यःस्थितीची गरज, नवीन उद्योग करण्याची संधी या संकल्पनेतून रेडी टू कुक मसाल्यांची वाढती मागणी आहे. हे लक्षात घेता व्यावसायिक दृष्टीने रेडी टु कुक इन्स्टंट मसाले व ग्रेव्ही प्रात्यक्षिकासह शिकवणारे प्रशिक्षण १० जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजिले आहे. यामध्ये इन्स्टंट तांबडा रस्सा, इन्स्टंट पांढरा रस्सा, पंजाबी रेड, हैदराबादी, व्हाइट, गोल्डन व ग्रीन ग्रेव्ही, चिकन साउथ इंडियन ग्रेव्ही, चिकन ६५, पनीर टिक्का, इन्स्टंट मिसळ मसाला हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी आदी विषयी तज्ज्ञ गंधाली दिंडे मार्गदर्शन करतील. नोट्सही व डिजिटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क १७५० रुपये.

व्यावसायिक इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड
सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड तयार करण्यास शिकवणारी एक दिवसीय प्रात्यक्षिकांवर आधारित कार्यशाळा ११ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजिली आहे. यामध्ये इडली पीठ, दोसा पीठ, उडीद वडा, गुलाब जामून मिक्स, आइस्क्रीम मिक्स, इन्स्टंट फालुदा, नाचणी दोसा, नाचणी इडली, पकोडा मिक्स, रबडी मिक्स, ढोकळा मिक्स, इडली चटणी मिक्स, गोबी मंचुरियन मिक्स, तंदूर मिक्स हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी आदी विषयी तज्ज्ञ गंधाली दिंडे मार्गदर्शन करतील. नोट्सही व डिजिटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क १७५० रुपये.

आगाऊ नोंदणी आवश्यक व नोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com