स्वच्छ शहरासाठी नवे पाऊल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ शहरासाठी नवे पाऊल!
स्वच्छ शहरासाठी नवे पाऊल!

स्वच्छ शहरासाठी नवे पाऊल!

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी सुरु केलेल्या ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ या मोहिमेअंतर्गत पुनर्वापर होऊ शकणाऱ्या जुन्या वस्तू जमा करण्यासाठी महापालिकेने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १७ ठिकाणी केंद्र तयार केले आहेत. ‘रिड्युस, रियुज आणि रिसायकल’ (आर.आर.आर.) या नावाने संबंधित केंद्र असून त्यामध्ये जुने कपडे, मुलांची खेळणी, भांडी यांसारख्या वस्तू जमा करता येणार आहेत.
पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांच्या मदतीने ‘स्वच्छ भारत मिशन २.०’ अंतर्गत ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये ‘आर.आर.आर.’नुसार पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामध्ये जुनी पुस्तके, पेपर, मॅगझीन, कार्डबोर्ड, प्लॅस्टिक, थर्माकोल, फर्निचर, काच, काचेच्या बाटल्या, भांडी, ई कचरा, जुनी कपडे, पादत्राणे यासह इतर वस्तू गोळा करण्यात येणार आहेत. पर्यावरणपुरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत बाराशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १७ ठिकाणी विविध सोसायट्या, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मोकळी मैदाने, बाजारपेठा या ठिकाणी ‘आर.आर.आर.’ केंद्र तयार करण्यात आली आहेत. तेथे नागरिकांना आपल्याकडील जुन्या वस्तू देता येणार आहे.

२७ टन जुन्या वस्तू जमा
- शहरातील नागरिकांनी आत्तापर्यंत २७ टन जुन्या वस्तू दिल्या आहेत
- जुन्या वस्तूंमध्ये कपडे ५६ टक्के, ई वेस्ट ८ टक्के, पुस्तके ९ टक्के
- २७ टक्के खेळणी, पादत्राणे, भांडी, शोभेच्या वस्तू, बॅग्स यांसारख्या वस्तूंचा समावेश
- या वस्तू संकलित करून त्यांचे नूतनीकरण करणे, नवीन उत्पादन करणे किंवा पुनर्वापर अशा कारणांसाठी वापर होणार


क्षेत्रीय कार्यालय ‘आर.आर.आर.’ केंद्राचे नाव
१) वडगाव शेरी - फॉरेस्ट काऊंटी सोसायटीजवळ, डॉ. हेडगेवार क्रीडांगण, कल्याणीनगर
२) येरवडा, कळस, धानोरी - रोड नं १०, डी, विद्यानगर
३) ढोले पाटील रोड - बर्निंग आरोग्य कोठी
४) औंध बाणेर - जुने औंध क्षेत्रीय कार्यालय
५) शिवाजीनगर घोले रोड - हिरवाई हजेरी कोठी, कमला नेहरू पार्क
६) कोथरूड-बावधन - मयूर कॉलनी आरोग्य कोठी
७) धनकवडी - सहकारनगर - तीन हत्ती चौक हजेरी कोठी, शरदचंद्र पवार उद्योग भवन
८) सिंहगड रोड - सनसिटी आरोग्य कोठी
९) वारजे कर्वेनगर - नादब्रम्ह आरोग्य कोठी
१०) हडपसर मुंढवा - मगरपट्टा चौक, मेगा सेंटरजवळ
११) कोंढवा येवलेवाडी - पेशवे तलाव कोठीजवळ
१२) वानवडी रामटेकडी - शिवरकर उद्यान, वानवडी
१३) कसबा विश्रामबागवाडा - इंद्रधनुष्य
१४) भवानी पेठ - मनपा कॉलनी नं.८, घोरपडी पेठ
१५) बिबवेवाडी - व्हिआयटी आरोग्य कोठी, अप्पर