व्हायोलिन ॲकॅडमीतर्फे
आजपासून ‘स्वरमल्हार’

व्हायोलिन ॲकॅडमीतर्फे आजपासून ‘स्वरमल्हार’

पुणे, ता. २ ः व्हायोलिन ॲकॅडमी तर्फे स्वरमल्हार हा कार्यक्रम ३ व ४ जून रोजी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त पुणेकरांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्वरमल्हारचे यंदाचे आठवे पर्व असून त्याची सुरुवात झपुर्झा येथे ३ जून रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यात फोनिक्स या संस्थेच्या गायिका आश्रिता साठेनगिरी आणि विद्या देसाई सादरीकरण करणार आहेत. दुसऱ्या सत्रात पंडित काशिनाथ बोडस यांचे शिष्य व फोनिक्स घराण्याचे प्रसिद्ध गायक मनु श्रीवास्तव यांचे गायन होणार आहे. त्यानंतरच्या सत्रात निबनीता चौधरी यांचे गायन असून शेवटच्या सत्रात पुर्बायन चॅटर्जी यांचे सितार वादन आहे त्यांना तबला साथ पंडित विजय घाटे करणार आहेत. चार जून रोजी कोथरूड येथील बालशिक्षण सभागृहात सकाळी १० वाजता स्वरमल्हारच्या दुसऱ्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अश्रिता साठेनगिरी आणि विद्या देसाई यांचे गायन होणार आहे. त्यानंतर इटावा घराण्याचे युवा सितार वादक शाकीर खान यांचे सितार वादन होणार आहे. शेवटच्या सत्रात फारुखाबाद घराण्याचे लोकप्रिय तबला वादक ताल ऋषी पं. अनिंदो चॅटर्जी यांचे सोलो तबला वादन होणार आहे. या कार्यक्रमात पंडित अतुलकुमार उपाध्ये पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com