पुण्यात सोमवारी रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात सोमवारी
रोजगार मेळावा
पुण्यात सोमवारी रोजगार मेळावा

पुण्यात सोमवारी रोजगार मेळावा

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व स्वामी विवेकानंद संस्था पुणे यांच्यातर्फे येत्या सोमवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता नाना पेठेतील महात्मा फुले हायस्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण २१ उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडे भरतीसाठी २८३० पदे आहेत. या रोजगार मेळाव्यात दहावी-बारावी उत्तीर्ण तसेच सर्व शाखांचे पदवी, पदव्युत्तरपदवी, पदविकाधारक अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी आहेत. पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात नोकरी मिळू शकते. सर्व इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपापले पसंतीक्रम नोंदवावेत. तसेच मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली मुळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सा. ब. मोहिते यांनी केले आहे.