रंगला बंधुता काव्य महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगला बंधुता काव्य महोत्सव
रंगला बंधुता काव्य महोत्सव

रंगला बंधुता काव्य महोत्सव

sakal_logo
By

पुणे, ता. २ : ‘‘काव्य, गीत आणि संगीत यांना भाषा, प्रदेश किंवा विदेशाच्या सीमा रोखू शकत नाहीत. मानवतावादी भावविश्व गुंफणारे हे साहित्य सहजपणे सर्वदूर पोहोचते. कवी, गीतकार व संगीतकार यांनी आपल्या उत्कट प्रतिभेला ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हे काव्य क्षितिज अधिकाधिक विस्तीर्ण करावे,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांनी व्यक्त केली. पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्ष स्थानावरून झिंजुरके बोलत होत्या.
काव्य महोत्सवाचे उद्‍घाटन साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग, शिवव्याख्याते प्रदिप कदम, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण उपस्थित होते. यावेळी पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रातील योगदानाबद्दल जिवराज चोले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार’, तर काव्य निर्मितीसाठी ज्ञानेश सूर्यवंशी, नंदा कोकाटे, वीणा व्होरा, नंदकिशोर लांडगे, नितीन गायके, राजश्री मराठे, प्रीती वानखेडे, गजानन गायकवाड, महादेव सुरवसे, कल्पना देशमुख यांना ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.