नॅक मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांमधील पदवी प्रवेश सापडले कोंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅक मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांमधील पदवी प्रवेश सापडले कोंडीत
नॅक मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांमधील पदवी प्रवेश सापडले कोंडीत

नॅक मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांमधील पदवी प्रवेश सापडले कोंडीत

sakal_logo
By

नॅकसाठी विद्यापीठाचा महाविद्यालयांना बडगा
पूर्वपरवानगीशिवाय प्रथम वर्ष प्रवेश न करण्याचा आदेश
पुणे, ता. ९ : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत घसरण झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदे’च्या (नॅक) मुल्यांकनासाठी बडगा उगारला आहे. ‘नॅक’ मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पदवी परिक्षेचे कोणत्याही अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे पूर्वपरवानगीशिवाय करू नयेत, असा आदेश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढला.
नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांनी प्रथम वर्षाचे प्रवेश करून नयेत, असे परिपत्रक राज्य उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने २३ मे रोजी जारी केले होते. त्यानुसार विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या. महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन प्रक्रियेची माहिती विद्यापीठ प्रशासनासमोर सादर करावी, असेही सांगण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत नॅक मूल्यांकनाला विशेष महत्त्व आहे. यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असूनही पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी अद्याप नॅक मूल्यांकन केले नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेवर होईल.
सध्या बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू असतानाच विद्यापीठाच्या आदेशामुळे नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांची कोंडी झाली आहे.
---
जबाबदारी महाविद्यालयांचीच
महाविद्यालयांनी, मान्यताप्राप्त परिसंस्थांनी इन्स्टिट्यूशनल इन्फर्मेशन फॉर क्वॉलिटी असेसमेंट (आयआयक्यूए) अद्याप नॅक कार्यालयास अद्याप सादर केलेले नाही. तसेच नॅक मूल्यांकन झालेले नाही अशा महाविद्यालयांनी पूर्वपरवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे प्रवेश केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संस्था, प्राचार्य, संचालक यांची राहील, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
-----