
शेतीत ड्रोन वापराबाबत उद्या राज्यस्तरीय कार्यशाळा
पुणे, ता. ९ : शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाच्या फवारणीसाठी प्रभावी वापर आणि त्याचे उत्कृष्ट परिणाम कसे मिळतात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी राज्यस्तरीय कार्यशाळा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि सकाळ-ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ११) सकाळनगर येथे होणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते होईल. शेतीत ड्रोनचा वापर करायचा असेल तर त्यासाठी काही नियम व माहिती असणे आवश्यक आहेत. ड्रोन हे हवेत उडणारे वाहन असल्यामुळे त्यासाठी काही परवानगी किंवा परवाने घ्यावे लागतात. यासह ड्रोनची ओळख, प्रकार, शेतीत वापर, फवारणीसाठी वापर, फायदे, नियम, ड्रोनचे विविध घटक, कार्यप्रणाली, ड्रोनने फवारणीसाठी मान्यताप्राप्त रासायनिक द्रावणे, फवारणी ड्रोनच्या साहाय्याने कीटकनाशके, खते फवारणीसाठीची मानके, फवारणी ड्रोनच्या विविध घटकाची ओळख व प्रात्यक्षिक, फवारणी ड्रोनच्या प्रसारासाठी शासनाचे विविध उपक्रम आणि अशा अनेक बाबींसंदर्भात मार्गदर्शन होणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, शास्त्रज्ञ डॉ. सचिन नलावडे, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. शिरीषकुमार भणगे, डॉ. मुकुंद शिंदे, इंजिनिअर निळकंठ मोरे इ.तज्ज्ञ कार्यशाळेसाठी लाभणार आहेत.
जेवण व डिजिटल प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क १२०० रुपये. आगाऊ नोंदणी आवश्यक.
व्यावसायिक इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड
इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये मागणी आहे हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड ही प्रात्यक्षिकावर आधारित कार्यशाळा रविवारी (ता. ११) होणार आहे. यामध्ये इडली पीठ, डोसा पीठ, उडीद वडा, गुलाब जामून मिक्स, आइस्क्रीम मिक्स, इन्स्टंट फालुदा, नाचणी डोसा, नाचणी इडली, पकोडा मिक्स, रबडी मिक्स, ढोकळा मिक्स, इडली चटणी मिक्स, गोबी मंचुरियन मिक्स, तंदूर मिक्स हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, मशिनरी इ.विषयी गंधाली दिंडे मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क १७५० रुपये.
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
नोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२