केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोचवा ः प्रल्हाद सिंह पटेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय योजना लोकांपर्यंत 
पोचवा ः प्रल्हाद सिंह पटेल
केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोचवा ः प्रल्हाद सिंह पटेल

केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोचवा ः प्रल्हाद सिंह पटेल

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः ‘‘केंद्र सरकारच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक सरकारी योजना राबविल्या जात आहे. या योजनांच्या माध्यमातून समाजाचा विकास होण्यास फायदा होत आहे. त्यामुळे या योजना सामाजिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा,’’ अशी सूचना केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग खात्याचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सोशल मीडिया विभागाच्या कार्यकर्त्यांना केली.

भाजपच्या वतीने पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सोशल मीडिया विभागातील कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच हांडेवाडी (ता. हवेली) येथे आयोजित केली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी ही सूचना केली. यावेळी भाजपचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी संजय टंडन, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश मोटे, श्रीकांत थिटे, मारुती किंडरे, डॉ. तेजस्विनी गोळे, स्नेहल दगडे, धनंजय कामठे, सचिन हांडे, पंडित मोडक, संदीप हरपळे, राजेंद्र भिंताडे आदींसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना पटेल यांनी कोरोना लसीकरण, मोफत पक्की घरे, ग्रामीण भागात शौचालयांची निर्मिती, घरोघरी नळ कनेक्शन, मोफत गॅस जोडणी, मोफत अन्नधान्य, आयुष्यमान भारत योजना, शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी सहा हजार रुपयांचे रोख अनुदान, जन-धन योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, मुद्रा योजना आदी योजनांची माहिती दिली.