एपीजी लर्निंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीजी लर्निंग
एपीजी लर्निंग

एपीजी लर्निंग

sakal_logo
By

शिका क्लाऊड कॉम्प्युटिंग बिझनेस मॉडेल

पुणे, ता. २२ : वेगवेगळ्या संस्था व उद्योग यांना डेटा बॅकअप, रिकव्हरी, व्हर्चुअल डेस्कटॉप, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व टेस्टिंग, बिग डेटा अनॅलिटीक्स, कस्टमर फेसिंग वेब ॲप्लिकेशन्स इत्यादी विभिन्न कारणांसाठी क्लाऊड सेवा आवश्यक आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग हे लवचिकता, डेटा पुनर्प्राप्ती, कमी देखभाल आणि उच्च पातळीची सुरक्षा प्रदान करते. या पार्श्वभूमीवर एक सेल्फ पेस्ड प्रशिक्षण १२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यामध्ये एकूण १०० तासांपैकी ७० तास सेल्फ पेस्ड लर्निंग व ३० तासांचे लाइव्ह लेक्चर्स असणार आहेत. एडब्लूएस व व्हीएमवेअर या प्लॅटफॉर्मवर हॅण्ड्स ऑन प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये. प्रशिक्षण पूर्ण केल्यास नासकॉमचे प्रमाणपत्र व फायनल असेसमेंट टेस्ट दिल्यानंतर ५० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०२.

सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

व्यावसायिक बंदिस्त शेळी-मेंढी पालन

पुणे, ता. २२ : मटणाचा व्यवसाय करणाऱ्यांना बोकड, मेंढ्या (बोल्हाई) विक्री, जातीवंत बोकड तयार करून त्यांची विक्री, असे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे विविध पर्याय याद्वारे उपलब्ध होऊ शकतात. या व्यवसायाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता.२९) आयोजिली आहे. यात शेळ्या, मेंढ्यांच्या विविध जाती, निवड, करडांचे व शेळी-मेंढीचे शास्त्रोक्त संगोपन, गोठा व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थशास्त्र, आजार व उपाययोजना, लसीकरण, शासकीय योजना व अनुदान इ.विषयांचा समावेश आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी उत्तम व्यवस्थापन असलेल्या शेळी व मेंढी फार्मला शिवार फेरीचे आयोजन आहे. जेवण, चहा प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये. २६ जानेवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना ५०० रुपये सवलत मिळेल.

नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे