Mon, Feb 6, 2023

रिपब्लिकन पक्षाचे एकदिवसीय अभ्यास शिबिर
रिपब्लिकन पक्षाचे एकदिवसीय अभ्यास शिबिर
Published on : 22 January 2023, 12:43 pm
पुणे, ता. २२ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे एकदिवसीय अभ्यास शिबिर मंगळवारी (ता. २४) महाबळेश्वर येथे होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह मान्यवर त्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. अच्युत माने, प्रा. ऋषिकेश कांबळे, डॉ. विजय खरे, प्रा अनिलकुमार सपकाळ हे ‘रिपब्लिकन पक्ष व्यापक व मजबूत कसा होईल?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे आयोजन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस व सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी दिली.