पतीचा पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पतीचा पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे, ता. २२ ः पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत पतीने पत्नीचा गळा आवळून तसेच तिच्यावर चाकूने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी या महिलेच्या पतीला तत्काळ अटक केली.

हेमंत सोनवणे (वय ३७, रा.विठ्ठलनगर, वारजे माळवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोनवणे हा फिर्यादी महिलेचा पती आहे. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून भांडणे सुरू होती. दरम्यान, १९ जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगर परिसरात ते राहत असलेल्या ठिकाणी पती हेमंत सोनवणे याने ‘तु मला आई, बहिणीवरून शिवीगाळ का करतेस?’ ‘भांडणं का करतेस?’ असा जाब विचारत फिर्यादीचा गळा दोरीने आवळला. त्यानंतर त्याने त्याच्याकडील चाकू फिर्यादीच्या पाठीत व पोटात मारून महिलेला गंभीर जखमी केले. या घटनेनंतर महिलेला उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हेमंत सोनवणे यास अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com