

पुणे, ता. २६ : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना वारजे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संबंधित चोरट्यांकडून शहराच्या वेगवेगळ्या भागांत एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संतोषीकुमार किशोरीलाल सरोज (वय ३०) आणि प्रदीपकुमार नंदकिशोर मौर्य (वय २८, दोघे रा. वारजे, मूळ प्रतापगड, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात एका नागरिकाने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरूड परिसरात राहतात. वारजे येथील एनडीए रस्त्यावरील एका बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या नागरिकांना पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी बॅंकेकडे आल्या होत्या. एटीएममधून व्यवहार केल्यानंतर नागरिकांना बॅंकेकडून संदेश आले होते. त्यानंतर बॅंकेने एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये दोन संशयित व्यक्ती आढळून आले होते. त्यानंतर बॅंक व्यवस्थापकांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे तक्रार दिली होती. वारजे पोलिसांनी एटीएमच्या परिसरात सापळा लावून सरोज व मौर्य यांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.