ससूनमधील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

ससूनमधील रक्तदान शिबिरास प्रतिसाद
Published on

पुणे, ता. २५ : बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय येथील रक्त केंद्रात १४ ते १७ मेदरम्यान चारदिवसीय रक्तदान शिबिर पार पडले. नाशिकच्‍या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्‍या सूचनेनुसार सीमाभागातील आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर रक्त साठा राखण्यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८३ युनिट रक्त संकलन झाले.
एमबीबीएस, एमडी विद्यार्थी, प्राध्यापक व रुग्णालय कर्मचाऱ्यांनी उत्साहाने व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रक्तदान केले. शिबिराचे आयोजन अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सोमनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. रक्त केंद्रप्रमुख डॉ. वर्षा भाटिया यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.
‘‘हा सामूहिक उपक्रम आरोग्य क्षेत्रातील सेवाभाव, एकोप्याची भावना व करुणा दर्शवतो. अशा संकटाच्या काळात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी इतर महाविद्यालये, रुग्णालये व संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com