‘एमयूएचएस’च्‍या कुलगुरूपदी
डॉ. अजय चंदनवाले

‘एमयूएचएस’च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

Published on

पुणे, ता. २४ : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची ‘महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (एमयूएचएस) या संस्‍थेच्‍या कुलगुरुपदी नियुक्‍ती केली आहे. पुढील सहा महिन्‍यांसाठी ती असेल. याबाबतचा आदेश ‘एमयूएचएस’ चे कुलपती आचार्य देवव्रत यांनी जारी केल्‍यानंतर राज्‍यपाल कार्यालयाचे सचिव प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी (ता. २३) आदेश निर्गमित केले आहेत. डॉ. चंदनवाले यांच्‍याकडे ‘एमयूएचएस’ च्‍या कुलगुरूपदाबरोबर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) या पदाचीही धुरा असणार आहे.
याआधी ‘एमयूएचएस’ च्‍या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या होत्‍या. १४ ऑक्‍टोबर रोजी त्‍या सेवानिवृत्‍त झाल्‍या असून, रिक्‍त पदावर डॉ. चंदनवाले यांची नियुक्‍ती झाली आहे. डॉ. चंदनवाले ससून रुग्‍णालयात अधिष्‍ठाता पदावर दहा वर्षे होते. त्‍यांच्‍या कार्यकाळात त्‍यांनी ससून रुग्‍णालयात विविध उपक्रम व योजना राबवत रुग्‍णालयामध्‍ये सुधारणा केली. यामध्‍ये प्रामुख्‍याने रुग्‍णालयातील विविध सुविधा व श्रेणीवर्धनासाठी १०० कोटींहून अधिक निधी हा विविध सामाजिक संस्‍था, उद्योजक यांच्‍या माध्‍यमातून ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ (सीएसआर फंड) उभा केला. त्‍याचा थेट फायदा गोरगरीब रुग्‍णांना झाला. कोरोना काळात २०२० मध्‍ये त्‍यांची नियुक्‍ती ‘डीएमईआर’ च्‍या सहसंचालक पदावर झाली. तर जुलै २०२३ मध्‍ये ते प्रभारी संचालक झाले. तर काही महिन्‍यांपूर्वी ते पूर्णवेळ संचालक झाले.
.....................
फोटो ः 62215

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com