अवती भवती

अवती भवती

Published on

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

पुणे, ता. २५ : ‘ग्रो बिझनेस नेटवर्क्स’ या संस्थेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने सदस्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात गाणी, नृत्य, शायरी, एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. या वेळी संस्थापक विक्रांत गोखले, सहसंस्थापक संज्योत दफ्तरदार, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख गौरी जोशी, कोल्हापूर रिजन प्रमुख वैशाली पवार यांच्यासह १०० उ‌द्योजक व कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी गोखले म्हणाले, ‘उ‌द्योजकांनी परस्परांत स्पर्धा करण्याऐवजी सहकार्य करावे. यामुळे उ‌द्योग व्यवसायाची मोठी प्रगती होते.’


गुणवंत वि‌द्यार्थ्यांचा सत्कार
पुणे, ता. २५ : विद्यार्थी सेवा संघाच्या वतीने गुणवंत वि‌द्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या वेळी खासदार नीलेश लंके, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि मेहतर वाल्मीकी महासंघाचे अध्यक्ष रवी परदेशी यांच्या हस्ते गुणवंत वि‌द्यार्थ्यांना सायकल भेट, रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी संघाचे विश्वस्त नरोत्तम चव्हाण, कविराज संघेलिया, विश्वास चव्हाण, बंडू चरण, कणव चव्हाण, सिद्धांत सारवान, प्रमोद निनारिया, धनराज जावा, रवी भिंगानिया, शैलेंद्र चव्हाण, विकास कसोटे, रवी वाघेला, गोपी कसोटे, निकेत चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल करोते यांनी केले.

संसार उपयोगी साहित्य, ब्लँकेट वाटप
पुणे, ता. २५ : देवेंद्र शुक्ल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्यातील वडकबाळ गावातील २२८ पूरग्रस्त कुटुंबे व महिला बचतगटांना २५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य, ब्लँकेट वाटप करण्यात आले. यात तांदूळ, पीठ, साखर, चहा, तेल, आवश्यक मसाले, किराणा आदी साहित्याचा समावेश आहे. उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल शुक्ल, संस्थेचे सदस्य अर्जुन खानापुरे, मयंक खळदकर, सागर देव, गौरव घाडगे, ओम भोसले, गणेश गाडे, मंदार गंभीर, अवनीश शिर्के, शुभम मुंदडा, समर्थ बोथरे व दीपक पांडे आदींनी सहभाग घेतला.

राजगडावर दिवाळीनिमित्त स्वच्छता
पुणे, ता. २५ : क्षितिज क्रिएशन्स या संस्थेनेतर्फे बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा यादिवशी राजगडावरील पद्मावती देवी मंदिर, मंदिराचा परिसर, राणी सईबाईची समाधी तसेच गडावरील सर्व प्रमुख वास्तूंची स्वच्छता करून पूजन केली. त्यानंतर रांगोळी कलाकार बसवराज करशेट्टी यांनी रांगोळीची आरास करून त्यावर पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ‘क्षितिज’च्या कार्यकर्त्यांनी पद्मावती देवीची पूजा करून ओटी भरून प्रार्थना केली. महेश वाघमारे आणि दिनेश राऊत यांनी फुलांची आरास केली. व्यवस्थापनात माऊली सूर्यवंशी, विनोद दळवी, नरेंद्र डोईफोडे, प्रशांत बावडेकर, रणजित घोलप, शेखर धावडे आदींनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com