महापुरुषांवरील पुस्तके खरी व निष्पक्ष हवीत
डॉ. मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा ः अनुबाईसाहेब घोरपडे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

महापुरुषांवरील पुस्तके खरी व निष्पक्ष हवीत डॉ. मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा ः अनुबाईसाहेब घोरपडे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

Published on

पुणे, ता. २६ ः सध्या अनेक व्यक्ती आणि नेते महापुरुषांची बदनामी करणारे वक्तव्य करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांना सडेतोड उत्तर द्यायचे असेल तर त्या- त्या महापुरुषांवर आणखी पुस्तके निघायला हवीत. ज्यात आरोप करणाऱ्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे मिळतील. त्या पुस्तकांतील माहिती खरी आणि निष्पक्ष असायला हवी, अशी अपेक्षा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मोहिनी पेशवा-करकरे यांनी इचलकरंजीच्या राजमुखत्यार राणी अनुबार्इ घोरपडे यांच्यावर लिहिलेल्या ‘दी रिजंट क्वीन ऑफ इचलकरंजी ः अनुबाईसाहेब घोरपडे’ ग्रंथाचे प्रकाशन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी (ता. २६) झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे आणि लेखक व इतिहास तज्ज्ञ डॉ. उदय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘ इतिहासात महिला किती सक्रिय होत्या, हे आता आपण पाहत आहोत. महिलांचे शौर्य उदाहरणांसह या ग्रंथात मांडण्यात आले आहे. यातून अनुबार्इ यांच्या कीर्तीची अनुभूती येते. इतिहासाची आणखी चांगली पुस्तके आली पाहिजेत. त्यासाठी चांगल्या अभ्यासकांनी पुढे यायला हवे व अशा लिहित्या हातांना राजकीय पाठबळ मिळावे.’’
डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले, ‘‘मराठा महिलांनी अनेक गौरवशाली कामे केली आहेत. त्या केवळ सक्षम नव्हत्या तर त्यांच्यात शौर्य देखील होते. त्याची प्रचिती या पुस्तकातून येते.’’
इचलकरंजी इनामाची माहिती यावेळी मोहिनी पेशवा-करकरे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘या पुस्तकांच्या माध्यमातून इचलकरंजी संस्थानचा गौरवशाली इतिहास मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात माझे वडील आणि काका यांनी मोठी मदत केली आहे.’’ साईली पलांडे-दातार यांनी सूत्रसंचालन केले.

कोट
‘‘अनुबाई यांनी गरजेच्या वेळी आपल्या संस्थानाची जबाबदारी स्वीकारली. मुलगा आणि नातवाबरोबर त्या युद्ध मोहिमेवर गेल्या. अठराव्या शतकात त्यांच्या संस्थानावर अनेक संकटे आली. वतनावरून वाद झाले. अनेकदा त्या राजकारणाच्या बळी ठरला. मात्र या सर्व काळात त्यांनी संस्थानावर आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देत ती संकटे परतून लावली.’’
-पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ज्ञ


फोटो ः 62560

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com