हडपसर, कोरेगावचा 
पाणीपुरवठा गुरुवारी बंद

हडपसर, कोरेगावचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Published on

पुणे, ता. २७ : पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्तीचे तसेच भामा आसखेड योजनेतील जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ३०) हडपसर, कोरेगाव पार्क, वडगाव शेरी आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणार भाग
लष्कर जलकेंद्र क्षेत्र :
रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता (डावी बाजू), केशवनगर- मांजरी बुद्रूक, शेवाळेवाडी, बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता (उजवी बाजू), हांडेवाडी रस्ता, फुरसुंगी-उरुळी देवाची (टँकरद्वारे पुरवठा बंद), भेकराईनगर, मंतरवाडी, बेकर हिल टाकी परिसर (कोंढवा खुर्द व वानवडी).

खराडी व भामा आसखेड योजना :
खराडी, आपले घर, भानगाई वस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पठारे नगर, सातववस्ती, थिटेवस्ती, चंदननगर, बोराटेनगर, यशवंतनगर, तुकारामनगर, वडगाव शेरी, गणेशनगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, मते नगर, माळवाडी, महावीरनगर, शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथनगर, वाढेश्वरनगर, मारुतीनगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटेनगर, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com