‘मोहिनी’ दिवाळी अंक

‘मोहिनी’ दिवाळी अंक

Published on

स्वागत दिवाळी अंकाचा
---
१) मोहिनी
----------
विनोदी कथा, हास्यचित्रे, विनोदी कादंबरी त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतील घडामोडींचा वेध आदी भरगच्च मजकूर अंकात आहे. विजय कापडी, रवींद्र तांबोळी, विजय देव, सुभाष सुंठणकर, वसंत मिरासदार, नितीन मोरे, सुरेशचंद्र वाघ, अविनाश चिंचवडकर, विलास फडके, रेखा नाबर, गजानन परब आदींच्या विनोदी कथांनी अंक सजला आहे. अरुण नासिककर यांच्या विनोदी कादंबरीने अंकाची उंची वाढली आहे. श्रीकांत कोरान्ने, ज्ञानेश बेलेकर, एस. ए. मुलाणी, प्रभाकर दिघेवार, प्रभाकर झळके आदींची हास्यचित्रे आहेत. कलादालन या विभागात विनोद गोरवाडकर, विलास गीते, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीकांत धोंगडे, रूचीप्रकाश कुलकर्णी, दिलीप कुकडे, निखील गजेंद्रगडकर, नंदू मुलमुले, सुभाषचंद्र जाधव आदींचे लेख आहेत.
संपादक ः अभिराम अंतरकर, पाने ः ३२०, किंमत ः ४५० रुपये
-----------------------
२) सह्याद्रीनंदन
जीवनाच्या विविध अंगाला स्पर्श करणाऱ्या कथा, लेख त्याचबरोबर आशयसंपन्न कवितांचा समावेश अंकात आहे. नारायण महाराज, अप्पासाहेब खोत, प्रा. व. बा. बोधे, सु. ल. खुटवड, विजयराव जाधव, सरिता देशपांडे, चंद्रकांत पारकर, प्रा. लक्ष्‍मण मोहिते, प्रा. प्रकाश मोरे, मोहन रावळ, स्वाती दिवाण, विकी पातोडे यांच्या कथा आहेत. गुन्ह्याचे गूढ उकलणाऱ्या पोलिसी कथा संजय इंगुळकर यांनी लिहिल्या आहेत. मोहन जाधव, ज्योत्स्ना चांदुगडे, सुजाता घाडीगांवकर, संतोष गाढवे, सोनाली जगताप, मीना ठाकोर, दीपाली घाडगे, शांभवी बोधे आदींच्या कविता आहेत.
संपादक ः संजय इंगुळकर, पाने ः १४४, किंमत ः २०० रुपये

३) जडण-घडण
ज्ञान आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे लेख अंकात आहेत. ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ या विषयावर विविधांगी लेखांद्वारे भाष्य करण्यात आले आहे. भारतीय ज्ञानप्रणाली आणि बौद्धिक संपदा हक्काची यशस्वी लढाई ः डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय ज्ञानप्रणाली-अविनाश धर्माधिकारी, डॉ. विजय भटकर- प्राचीन भारतीय विकसित विज्ञान -तंत्रज्ञान विचार, डॉ. गो. बं. देगलूरकर-भारतीय संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण : मंदिरं आणि मूर्तिशास्त्र, दीपक करंजीकर- प्राचीन भारतीय अर्थविचार, डॉ. आसावरी बापट- प्राचीन राजकीय विचारधारा आणि नीतिमत्ता आदी लेखांचा समावेश आहे. त्याचबरोबर विजय कुवळेकर, अपर्णा संत, प्रा. सुहास बारटक्के, डॉ. दीपाली पाटवदकर आदींनी विविध विषयांवर लेखांची मांडणी केली आहे. यांसह भारतीय संविधान गौरव विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही लेखाचा समावेश आहे.
- मुख्य संपादक : डॉ. सागर देशपांडे, पाने : २३६, किंमत : ३०० रुपये
------------------------
४) कोकण मीडिया
कोकणातील खाद्यसंस्कृतीचे आकर्षण आजही लोकांना आहे. मात्र, काळानुरूप जुनी खाद्य संस्कृती लुप्त होत चालली आहे. अशा जुन्या कोकणी खाद्य संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने खाद्य संस्कृती या संकल्पनेवर आधारित कोकण मीडियाचा हा अंक आहे. यात शाकाहार, मत्स्याहार आणि मांसाहार अशा तिन्ही खाद्य संस्कृतीतील कोकणातील अनेक दुर्मिळ पदार्थाची माहिती मिळते. यानिमित्ताने अनेक ज्येष्ठ लोकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत, जुन्या पदार्थांची रसपूर्ण माहिती दिली आहे. तांदळाच्या नारळाच्या रसात घालून शेवयांचा सचित्र दिलेली कृती लक्षवेधक आहे. माशांचे विविध प्रकार, ठिकठिकाणचे वेगळे प्रकार खवय्यांसाठी पर्वणी आहे. कोकणाबद्दल असलेली ओढ अधिक दृढ करण्यात खाद्य संस्कृतीचा मोठा वाटा आहे. तिचे हे पारंपरिक वैभव या अंकातून शब्दबद्ध झाले आहे.

संपादक ः प्रमोद कोनकर, पाने : १०४, किंमत : १७५ रुपये
----------
५) मीडिया वॉच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने ‘संघाची शंभरी’ हा विषय ‘मीडिया वॉच’ ह्या अंकात प्रामुख्याने घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ‘संघ : स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लेख लिहिला आहे. ‘संघात फाटाफूट का झाली नाही?’ या प्रश्‍नाचा वेध रमेश पतंगे यांनी
घेतला आहे. श्रीपाद कोठे यांनी ‘संघ, संघटना आणि संघटित समाज’ हा विषय हाताळला आहे. प्रकाश अकोलकर यांनी ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या लेखाचे लेखन केले आहे. नीलांबरी जोशी यांनी कवितांमधून उलगडणाऱ्या चित्रपटांचा धांडोळा घेतला आहे. प्रवीण बर्दापूरकर यांनी ‘ठाकरे ब्रँडचे काय होणार?’ या चर्चेतील विषयावर मांडणी केली आहे.

संपादक : अविनाश दुधे, पाने: १६६, किंमत ः ३०० रुपये

---------------------------------
६) माळी आवाज
साहित्य, आरोग्य, समाजकार्य आणि संवेदनशीलतेचा संगम म्हणजे माळी आवाज हा विशेषांक आहे. समाजसेवेच्या भावनेतून सुरू झालेल्या या मासिकाने साहित्यिकांना व्यासपीठ दिले असून, समाजबंधूंना एकत्र आणण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
सुरेशचंद्र वाघ, डॉ. कारभारी खरात, बीना बुनगे, माधुरी विधाटे, राजश्री बरळ, भारती सावंत, डॉ. धनजंय मानकर, प्रा. विजय नवले, माधुरी विधाटे यांच्या लेख, कथा अंकात आहेत. त्यातून समाजजागृती आणि मनोरंजनाचा सुंदर संगम दिसून येतो. परशुराम लडकत, प्रल्हाद दुधाळ, ज्योती कदम, कल्पना दुधाळ, डॉ. माणिक बनकर आदींच्या कविता आहेत.
संपादक : रागिणी विजयकुमार लडकत पाने : ९६ किंमत : २००
-------------------------------

७) शिक्षण संजीवनी
‘शाळेने दिली आयुष्याला संजीवनी’ या विषयावर आधारित ‘शिक्षण संजीवनी’ दिवाळी अंकातील लेख अत्यंत प्रेरणादायी आणि मूल्यप्रधान आहेत.
एकनाथ आव्हाड, गोविंद रोकडे, प्रा, प्रशांत शिरुडे, उत्तम सदाकाळ, मनोहर मोहरे, विलास फडके, नाजुका कदम, डॉ. विठ्ठल जाधव, जयश्री श्रीखंडे,
कल्पना म्हापूसकर, सचिन बेंडभर, किशोरी शंकर पाटील, चारुता प्रभुदेसाई, भारती सावंत, सुशील अंभोरे, संगीता एखंडे, चंद्रलेखा बेलसरे आदींचे लेख अंकात आहेत. लेखात शिक्षकांच्या योगदानाचे गौरवपूर्ण चित्रण, ग्रामीण ते शहरी शिक्षणातील बदल, तसेच नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीमुळे निर्माण झालेल्या संधींचा उल्लेख आहे.
संपादक : देविदास लिमजे, पाने : ८८ किंमत : २५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com