संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन

संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन

Published on

पुणे, ता. २५ ः विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी दुपारी टिळक चौकात राऊत यांचा निषेध नोंदविण्यात आला. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर घणाघाती आरोप केले होते. डॉ. गोऱ्हे यांच्या विधानाचा समाचार घेताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर कडक भाषेत टीका केली होती. दरम्यान, राऊत यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याविषयी अश्‍लाघ्य भाषा वापरून त्यांचा अवमान केला, असा आरोप करत शिवसेनेच्या वतीने मंगळवारी टिळक चौकात राऊत यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, सुरेंद्र जेवरे, सुदर्शना त्रिगुनाईत, विकास भांबुरे, श्रीकांत पुजारी, आकाश रेणुसे, युवराज शिंगाडे, मार्तंडराज धुंदुके, संदीप शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com