‘अभाविप’ची सदस्यसंख्या देशात पोचली ७६ लाखांवर
पुणे, ता. ९ ः संघटनात्मक विकास, शैक्षणिक धोरणे आणि सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर विचारमंथन करणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ७१वे राष्ट्रीय अधिवेशन उत्तराखंडमधील डेहराडून येथे उत्साहात पार पडले. देशात ‘अभाविप’ची सदस्यसंख्या आता तब्बल ७६ लाख ९८ हजार ४४८ झाल्याची माहिती संघटनेचे पश्चिम प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या तीनदिवसीय अधिवेशनात शिक्षण, बांगलादेशी घुसखोरी, नैसर्गिक आपत्ती, विभाजनवादी शक्ती आणि समाज परिवर्तन या विषयांवरील पाच ठराव मंजूर झाले.
देशात ‘वसतिगृह सर्वेक्षण अभियान’ आणि ‘परिसर चलो अभियान’, ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘अभाविप सार्धशती वर्ष’ साजरे करणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रसंगी पश्चिम प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर, पुणे महानगर मंत्री राधेय भाहेगवेंकर, राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य निकिता डिंबर आदी उपस्थित होते.
या अधिवेशनाला देशातून एकूण १२११ प्रतिनिधी उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पतंजली योगपीठाचे महासचिव आचार्य बालकृष्ण आणि उत्तराखंड सरकारमधील शिक्षण, आरोग्य व सहकार मंत्री धनसिंग रावत यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. रघुराज किशोर तिवारी आणि पुनर्निर्वाचित राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्रसिंह सोलंकी यांची घोषणा निवडणूक अधिकारी डॉ. मसाडी बापूराव यांनी केली. प्रसंगी प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार श्रीकृष्ण पाण्डेय यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

