जानेवारीत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा
पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ ः पालकमंत्र्यांकडून आढावा बैठक

जानेवारीत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ ः पालकमंत्र्यांकडून आढावा बैठक

Published on

पुणे, ता. २०: ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ च्या रूपाने देशात पहिल्यांदाच जानेवारीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने तयारीला लागावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले. या स्पर्धेमुळे पुणे शहर व जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत पवार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे
महापालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड शहर सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीएफआय) महासचिव मनिंदर पाल सिंग उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, मार्गाची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आदी बाबींवर लक्ष द्यावे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा. केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी. त्यानुसार आवश्यक तेथे त्रुटींची दुरुस्ती करता येईल.’’
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘‘स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व सायकलपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्व तयारी करण्यात यावी. मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात.’’
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले. ते म्हणाले,‘‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनाच्या क्षमता आंतरराष्ट्रीय पटलावर पोचणार आहेत. स्पर्धेसाठी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय), स्वित्झर्लंडकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला असून, लवकरच मान्यता मिळेल. स्पर्धा युसीआय आणि सीएफआय यांच्यावतीने होणार आहे. आगामी ऑलिंपिक स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा गणली जाणार आहे.’’
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com