भूगाव येथे सात गुंडांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूगाव येथे सात गुंडांकडून 
दहशत माजविण्याचा प्रयत्न
भूगाव येथे सात गुंडांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न

भूगाव येथे सात गुंडांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २२ : भूगाव (ता. मुळशी) येथील सात गुंडांनी एकत्र येऊन एका लाँड्रीचालक तरुणाला मारहाण करून दहशत माजविली. याबाबत शंतनू सुनील आंग्रे (वय २४, रा. भुकूम-आंग्रेवाडी, ता. मुळशी) या तरुणाने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार राकेश सुरेश वाघ, सतीश करगुले, विकी लोयरे, अभिषेक काळवीट, गट्टे मारणे, अक्षय साठे व अभिषेक पिलाणे (सर्व रा. माताळवाडी फाटा, ता. मुळशी) या सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरारी आहेत.

शुक्रवारी (ता. २१) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे-कोलाड रस्त्यावर आंग्रेवाडी फाटा येथे आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवून दहशत माजविण्याच्या उद्देशाने शंतनू आंग्रे या तरुणास शिवीगाळ केली. अभिषेक याने शंतनू याच्या डोक्यात लोखंडी फायटर मारून गंभीर दुखापत केली. त्यावेळी इतर सहा जणांनी दगडांनी प्राणघातक हल्ला करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इतर दुकानदार व गावातील लोक यांनाही दहशत माजविण्याच्या उद्देशाने हॉटेलसमोरील खुर्चीने मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी व अशा घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी भूगाव येथे रविवारी (ता. २३) सकाळी भूगाव व भुकूम या दोन गावातील ग्रामस्थांची गावबैठक आयोजित केली आहे.