जातवैधता प्रमाणपत्रासाठी एका वर्षाची मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जातवैधता प्रमाणपत्रासाठी एका वर्षाची मुदतवाढ
जातवैधता प्रमाणपत्रासाठी एका वर्षाची मुदतवाढ

जातवैधता प्रमाणपत्रासाठी एका वर्षाची मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १० : राज्यातील ग्रामपंचायतीच्या गेल्या वर्षीच्या (२०२१) निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे या सदस्यांना आता १७ जानेवारी २०२३ पर्यंत आपापले जातवैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. यासाठी याआधी १७ फेब्रुवारी २०२२ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ग्रामविकास विभागाने या बाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. यामुळे राखीव प्रवर्गातून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्य या गावकारभाऱ्यांना आणखी किमान एक वर्ष दिलासा मिळाला आहे.

राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका जानेवारी २०२१ ला झाल्या होत्या. या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांना निवडीनंतर तीन महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, सव्वावर्षाचा कालावधी संपून गेला तरी गावकारभाऱ्यांना अद्याप हे प्रमाणपत्र सादर करता आलेले नाही. यामुळे या गावकारभाऱ्यांची पदे धोक्यात आली होती. राज्यात २०२० पासून कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक निर्बंध लागू होते. परिणामी, यासाठी दिलेल्या अंतिम मुदतीत अनेकांना जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकले नाही. याने अनेकांची पदे धोक्यात आली होती. या सर्वांचा हा धोका आता टळला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pzp22b00704 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top