पुणे जिल्हा बँक घरासाठी ७५ लाखांपर्यंत कर्ज देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्हा बँक घरासाठी ७५ लाखांपर्यंत कर्ज देणार
पुणे जिल्हा बँक घरासाठी ७५ लाखांपर्यंत कर्ज देणार

पुणे जिल्हा बँक घरासाठी ७५ लाखांपर्यंत कर्ज देणार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज आदी कर्जांच्या कमाल रकमेच्या मर्यादेत मोठी वाढ केली आहे. शिवाय या कर्जासाठी सध्या आकारल्या जाणाऱ्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. यानुसार नोकरदार पुणेकरांना जिल्हा बॅंक आता घर खरेदीसाठी कमाल ७५ लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देणार आहे.

जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अजित पवार आणि अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी शनिवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी माजी अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे पवार आणि दुर्गाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यानुसार गृहकर्जाची मर्यादा कमाल ३० लाख रुपयांहून ७५ लाख, शैक्षणिक कर्जाची मर्यादा १५ लाख रुपयांवरून ३० लाख रुपये, परदेशात शिक्षणासाठीच्या कर्जाची मर्यादा २५ लाख रुपयांवरून ४० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

पवार म्हणाले, ‘‘नोटबंदीच्या निर्णयानंतर पुणे जिल्हा बँकेने ५५१ कोटी रुपयांच्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या होत्या. यापैकी २२ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अजूनही बॅंकेकडे शिल्लक आहेत. या नोटा जमा करून घ्याव्यात, या मागणीसाठी जिल्हा बँक सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र त्यावर अजून तोडगा निघाला नाही. राज्यातील विविध जिल्हा बँकांकडे अजूनही सुमारे ९० ते १०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत. नियमानुसार अंमलबजावणी व्हायला पाहिजे. पण रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेबद्दल शंका येते. जिल्हा बँक या नोटा जमा करून घेण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.’’


विविध कर्जांच्या व्याजदरात कपात

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कर्जांच्या व्याजदरात कपात केली आहे. यानुसार पगारदारांना दिल्या जाणाऱ्या कॅश क्रेडिट कर्जाचा व्याजदर ११ टक्क्यांवरून १० टक्के, गृहकर्जाचा व्याजदर ९ टक्क्यांवरून ८ टक्के, वाहन खरेदी कर्जाचा व्याजदर १०.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आला आहे.

लवासा प्रकल्प दिवाळखोरीत ः अजित पवार

मुंबई उच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्पाबाबतची केस निकाली काढली होती. मात्र आता पुन्हा लवासा प्रकल्प चर्चेत आला आहे. याबाबत मला अजून नोटीस आलेली नाही. दूरचित्रवाणीवरील बातम्यांमुळे मला ही चर्चा कळली आहे. पण आज लवासाची काय अवस्था आहे, ते पहा. सध्या लवासा प्रकल्प दिवाळखोरीत आला असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pzp22b00737 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..