महापालिका शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका शाळांमध्ये
वाचन प्रेरणा दिन साजरा
महापालिका शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

महापालिका शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जाणारा वाचन प्रेरणा दिन पुणे महानगरपालिकेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता. १५) पुस्तकांचे वाचन करत साजरा केला.
या उपक्रमाच्या निमित्ताने पालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व जीवनातील स्थान याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील नियमित वाचन करण्याची शपथ घेऊन ज्ञान संवर्धनाचा वसा पुढे नेण्याचा संकल्प केला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे ढोले पाटील रोड विभागाचे प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी वाचन प्रेरणा दिन अनुषंगाने शाळेत राबविलेल्या उपक्रमाचा व सहभागी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा आढावा घेतला.