दिवाळीनंतर शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनंतर शिक्षकांच्या
जिल्हाअंतर्गत बदल्या
दिवाळीनंतर शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

दिवाळीनंतर शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या या दिवाळीनंतर केल्या जाणार आहेत. या बदल्यांसाठीचे वेळापत्रक राज्य सरकारने गुरुवारी (ता. २०) जाहीर केले आहे. यानुसार पुणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने गुरवारी (ता. २०) सर्व जिल्हा परिषदांना शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचे सविस्तर वेळापत्रक पाठवले असून, या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला आहे.
कोरोना संसर्गामुळे मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. त्यातच राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द करून गेल्या वर्षी नवे बदली धोरण जाहीर केले होते. या नव्या धोरणानुसार ऑनलाइन बदल्या करण्यासाठी खास मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.