
चोपडज सोसायटीच्या अध्यक्षपदी गाडेकर
सोमेश्वरनगर, ता. १० : चोपडज (ता. बारामती) येथील चोपडज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश सूर्यकांत गाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी अनिल विठ्ठल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चोपडज सोसायटीसाठी तीस वर्षांनंतर प्रथमच दोन गटात लक्षवेधी निवडणूक झाली. त्यामध्ये सटवाई माता गावकरी पॅनेलने विरोधकांचा तेरा विरूध्द शून्य असा दणदणीत पराभव केला. यामध्ये गाडेकर व गायकवाड यांना संधी देण्यात आली. निवडीबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते त्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन तर अॅड. इम्रान खान यांनी आभार मानले. याप्रसंगी समीर गाडेकर, उमेश गायकवाड, राहुल गाडेकर, संतोष गाडेकर, श्यामराव पवार, सागर गायकवाड, संदीप गाडेकर, बापूराव गाडेकर, प्रमोद जगताप, महेंद्र गाडेकर, भानुदास साळुंखे, सुधीर गाडेकर उपस्थित होते.
01739
Web Title: Todays Latest Marathi News Som22b01123 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..