फोनवरील रेकॉर्डींग व्हायरल केल्याचा रागातून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोनवरील रेकॉर्डींग व्हायरल केल्याचा रागातून खून
फोनवरील रेकॉर्डींग व्हायरल केल्याचा रागातून खून

फोनवरील रेकॉर्डींग व्हायरल केल्याचा रागातून खून

sakal_logo
By

शिरूर, ता. ६ : फोनवरील रेकॉर्डींग व्हायरल केल्याचा राग मनात धरून त्याने मित्राचा काटा काढायचे ठरवले. त्यासाठी खूनाचा कट रचला. आणि मित्राच्या घरी जाऊन ओट्यावर मित्रच झोपला आहे, असे समजून कोयत्याने वार करून खून केला. परंतू खून झालेली व्यक्ती मित्र नसून मित्राचे वडील असल्याचा धक्कादायक प्रकार बाभूळसर खुर्द (ता. शिरूर) येथे उघडकीस आला. गुरुवारी (ता. ५) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या प्रकारातील हल्लेखोराला पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या मदतीने १२ तासात अटक केले.
निखिल सतीश थेऊरकर (वय १९, रा. कर्डे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव असून, त्याने केलेल्या हल्ल्यात जालिंदर सुदाम ढेरे (वय ५०, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर) यांचा खून झाला. त्यांच्या पत्नी अर्चना जालिंदर ढेरे यांनी याबाबत फिर्याद दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Sur22b00330 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top