ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू
ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू

ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू

sakal_logo
By

शिरूर, ता. १० : पुणे-नगर रस्त्यावर कारेगाव (ता. शिरूर) येथे आज रात्री उशिरा रहदारीच्या वेळी ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. त्यात एकजण जागीच ठार झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.
नागेश राजू सोनकांबळे (वय १८, रा. बेठमोगरा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे या अपघातातील मृताचे नाव असून, किशन यशवंत ससाणे (वय ३०, रा. संगेम, ता. बोधन, जि. निजामाबाद, तेलंगणा) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल केले आहे. राहुल किशन सोनकांबळे (रा. कारेगाव, ता. शिरूर. जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी नसिर अलीसाब भंडारकवठे (रा. देवर निंबरगी, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली.