Mon, March 27, 2023

बेलवंडी परिसरात तरुणावर गोळीबार
बेलवंडी परिसरात तरुणावर गोळीबार
Published on : 3 December 2022, 5:49 am
शिरूर, ता. ३ : फायनान्सर दिलेल्या मोटारीचे हप्ते न दिल्याच्या वादातून झालेल्या बाचाबाचीच पर्यावसान थेट गोळीबारात झाले. पुणे-नगर रस्त्यावर शिरूर पासून जवळच बेलवंडी फाटा परिसरात शुक्रवारी (ता.२) रात्री उशिरा हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून झाडलेली गोळी मोटारीच्या काचेवरील वायफरवर आदळल्याने अनर्थ टळला. अक्षय अर्जुन औटी (रा. सरदवाडी, ता. शिरूर) याने याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संकेत संतोष महामुनी व संकेत सुरवसे (दोघे रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
केला आहे.