
घरी पेरण्या चालू तरही आम्ही वारीत : वारकरी
स्वारगेट, ता २३ : कोरोनामुळे दोन वर्षात वारीला पडलेल्या खंडामुळे वारकरी हिरमुसले होते. मात्र यावर्षी वारकऱ्यांनी जोमात वारीत सहभाग घेतला. पाऊस पडल्याने अनेक वारकऱ्यांच्या घरी पेरण्या चालू आहेत, मात्र वारीचे वेध लागल्याने वारकरी आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी उत्साहात पुण्यात दाखल झाले.
नांदेड येथील वारकरी कोशाबाई ककुरे म्हणाल्या, ‘‘वारीत चालत असताना वयानुसार थकवा येतो. परंतु पाय धुतले की पूर्ण थकवा निघून जातो. त्यामुळे पुढचा प्रवास करण्यासाठी ऊर्जा मिळते. गेली २५ वर्ष मी वारी करीत आहे.’’
गावाकडे जोरात पाऊस झाला आहे. पेरण्या अर्धवट झाल्या आहेत. येताना मुलाला सांगितले आहे पेरण्या करून तू मी माझ्या पंढरीच्या दर्शनाला निघालो आहे .कोरोना मधून वाचलो त्यामुळे आता विठुरायाचे दर्शन घेता येईल. आपण भाग्यवान आहोत, म्हणून पुन्हा वारी करण्याची संधी विठुरायाने दिली, असे परभणी येथील वारकरी मनोहर दगडुबा यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Swg22b00877 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..