पालखी मार्गावरील कोंडीत अडकले पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी मार्गावरील कोंडीत अडकले पवार
पालखी मार्गावरील कोंडीत अडकले पवार

पालखी मार्गावरील कोंडीत अडकले पवार

sakal_logo
By

उंड्री, ता. ९ : हडपसरमध्ये मुख्यमंत्री येणार असल्याने पालखी मार्गावर मंतरवाडी चौकातून हडपसरकडे जाणारी चारचाकी वाहने सहा वाजल्यापासून बंद केली. या वाहतूक कोंडीमध्ये पावणेआठ वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार अडकल्याने वाहतूक पोलिसांची चांगली तारांबळ उडाली. तत्काळ वाहतूक पोलिसांनी हडपसरकडे जाणारी वाहने सुरू केली. उशिरापर्यंत मंतरवाडी चौकात वाहतूक सुरळीत झाली नसल्याने वाहनचालक कमालीचे त्रासले होते. मंतरवाडी चौक ते दिवे घाटापर्यंत वाहनांची खच्चून गर्दी झाल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. वरिष्ठांनी सांगितल्यामुळे वाहनांना बंदी घातल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे आणि हवेली तालुकाध्यक्ष भरत झांबरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Unr22a00783 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..