दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त
दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त

दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त

sakal_logo
By

उंड्री, ता. ११ ः काळेबोराटेनगर रेल्वेगेट ते म्हसोबानगर दरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, म्हसोबा गेटजवळ जलवाहिनीच्या तीन व्हॉल्व्हमधून पाणी गळती होत आहे. येथूनच मलवाहिनी आणि जलवाहिनी फुटली असल्याने साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी जलवाहिनीतून येत असल्याने नागरिक आजारी पडत आहेत. पालिका प्रशासनाने जलवाहिनी आणि मलवाहिनीची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

म्हसोबा गेटजवळ पाणी सोडण्यासाठी व्हॉल्व्ह असून, येथे चेंबर करण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाकडून वारंवार फक्त मलमपट्टी केली जाते. जलवाहिनीच्या बाजूलाच मलवाहिनी आहे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर जलवाहिनीच्या बाजूला साचलेले ड्रेनेजचे आणि मातीमिश्रित पाणी पुन्हा जलवाहिनीत जाते. पाण्याचा प्रवाह सुरू झाला की दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, व्हॉल्व्हची दुरुस्तीचे काम कायमस्वरूपी केले जाईल. पावसामुळे सर्वच रस्त्याची दाणादाण झाली आहे. प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

रेल्वेगेट ते म्हसोबानगर दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, अद्याप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने वाहनचालकांसह ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
- वैशाली वरुटे, काळेबोराटेनगर

सुरुवातीला पंधरा मिनिटे दुर्गंधीयुक्त पाणी येते. त्यानंतर ४० मिनिटे पाणी सुरू राहते. मात्र, पाण्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पावसाळी वाहिनी स्वच्छ केल्या नाहीत, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो.
- सोपान घोगरे, काळेबोराटेनगर

काळेबोराटेनगरमधील ३०-३५ व्हॉल्व्ह आहेत. तेथे चेंबर बांधण्याची गरज आहे. जलवाहिनीच्या बाजूलाच मलवाहिनी असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होतो, त्यावेळी साचलेले पाणी जलवाहिनीतून जात असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी येते.
- माया उणेचा, काळेबोराटेनगर

Web Title: Todays Latest Marathi News Unr22a00952 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..